inner-banner-pwd-circle
Home » आमच्या विषयी
PWD-Jawhar-Home

सार्वजनिक बांधकाम विभाग, - जव्हार

(स्थापना – मे १९९२)
सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार ची स्थापना मे १९९२ मध्ये करण्यात आली होती. जव्हार विभागाच्या स्थापना वेळी डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा व विक्रमगड हे सहा तालुके अंतर्भुत होते. सध्या विभागाचा कार्यक्षेत्र हे जव्हार, मोखाडा, वाडा व विक्रमगड या चार तालुक्यांमध्ये विस्तारले आहे.

कामाचा आवाका :

  • राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग (प्रजिमा): या मार्गांवरील देखभाल, दुरुस्ती व नविन कामांची अंमलबजावणी.
  • पूल बांधकाम व देखभालः परिसरातील प्रमुख नद्या व नाल्यांवर पूल बांधणे व त्यांचे व्यवस्थापन.
  • शासकीय निवासी व अनिवासी इमारतींचे बांधकाम, देखभाल व दुरुस्ती. 
  • आदिवासी व दुर्गम भागातील विशेष प्रकल्पः आदिवासी जनजातींना आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यासाठी रस्ते व पूल प्रकल्पांना प्राधान्य.
jawhar-about
Paryatan

भौगोलिक वैशिष्ट्ये :

जव्हार विभागाचा बहुतांश भाग आदिवासी बहुल व डोंगराळ भागात आहे. म्हणून विभागातील कामे सामाजिक आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

पर्यटन :

जय विलास पॅलेस, दाभोसा धबधबा, काळमांडवी धबधबा, हिरडपाडा धबधबा, भोपतगड किल्ला

मुख्य वैशिष्ट्ये :

• आदिवासी व दुर्गम भागातील विकासावर भर
• दर्जेदार व वेळेत पूर्ण होणारी कामे • स्थानिक गरजांनुसार योजनेची आखणी